LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*शेतकरी प्रश्नांवर भाजप आक्रमक; मोर्चा रोखत पोलिसांची धडपड*

Advertisement
कर्नाटक सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी सुवर्ण सौधला घेराव घालण्यासाठी निघालेल्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी हजारहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.

बेळगावात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस भाजपच्या मोर्चामुळे गाजला. राज्यातील विविध भागातून भाजप कार्यकर्ते, विरोधी पक्ष नेते, लोकप्रतिनिधी मोर्चात सहभागी झाले होते.कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी मोर्चाचे नेतृत्व केले होते. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात सरकार अपयशी ठरले आहे.

याशिवाय बेरोजगारी, पाणीप्रश्न, विणकरांच्या समस्या समस्या सरकारने सोडवल्या नाहीत असा आरोप बी. वाय. विजयेंद्र यांनी केला. भाजप कार्यकर्ते मोर्चाने सुवर्ण सौधकडे जात असताना पोलिसांनी मोर्चा अडवला. बॅरिकेडस ढकलून जाणाऱ्या कार्यकर्त्यांना अडवताना पोलिसांची तारांबळ उडाली. पोलीस आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली.अखेर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन हलवले.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*