प्राणप्रतिष्ठा व चंडिका होम विधींनी गावात भक्तीमय वातावरण!
बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक गावात आगामी महालक्ष्मी यात्रेच्या तयारीला सुरुवात झाली असून गावात सर्वत्र धार्मिक आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे. 2026 मध्ये होणाऱ्या या पारंपरिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज गावात उत्सव मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि चंडिका होम विधी पार पडले.
विधी संपन्न झाल्यानंतर भक्तांनी ओटी भरण्याचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने सुरू केला असून हा सोहळा संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालणार आहे. त्यानंतर मंदिराचे दरवाजे पूजाविधीनंतर बंद करण्यात येणार आहेत.
याचदरम्यान जुन्या महालक्ष्मी मूर्तीचे रंगकाम आणि देखभाल करण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. 28 एप्रिल 2026 रोजी महालक्ष्मी यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने पार पडणार असून, यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक दानशूर व्यक्ती व भक्तगण मोलाचा हातभार लावत आहेत.
या धार्मिक विधींमुळे संपूर्ण गाव भक्तीच्या आणि आनंदाच्या उत्सवात रंगून गेले आहे.

