बेळगावातील तरुणाईसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. प्रशांत पम्मार हा अँग्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाचा विद्यार्थी, प्रतिष्ठित TEDx मंचावर वक्ता म्हणून झळकला आहे.
लिंक्डइनवरील सक्रिय उपस्थिती आणि प्रेरणादायी विचारांमुळे ओळख निर्माण केलेल्या प्रशांतने TEDx व्यासपीठावर आपले विचार मांडत बेळगावचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचवले. त्याच्या या यशामुळे शहरातील विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा मिळाली आहे.
तरुण वयात अशा दर्जेदार मंचावर स्थान मिळवणे ही निश्चितच उल्लेखनीय बाब मानली जात आहे. शिक्षणासोबत व्यक्तिमत्व विकास आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर यामुळेच प्रशांतने ही झेप घेतल्याचे बोलले जात आहे.
त्याच्या या यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून आणि विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बेळगावच्या विद्यार्थ्यांसाठी हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

