LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*अंकुश केसरकर अध्यक्ष; शिवजयंती उत्सवाची तयारी सुरू*

Advertisement
बेळगाव : शहरातील मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून आगामी शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बळकटीसाठी ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.
आज पार पडलेल्या बैठकीत सर्वानुमते अध्यक्षपदी अंकुश अरविंद केसरकर यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यवाहपदी मदन बामणे आणि शिवराज पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.

नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून बाळाराम पाटील, रमेश पावले, प्रकाश शंकर पाटील, गणेश दड्डीकर, शिवाजी मंडोळकर, मोहन बेळगुंदकर, महेश जुवेकर, व्यंकटेश शहापूरकर, शुभम शेळके आणि लक्ष्मण होनगेकर यांची निवड करण्यात आली आहे.

सहकार्यवाहपदी ॲड. अमर येळ्ळूरकर, दिगंबर पवार, शिवाजी हंगीरकर आणि कपिल भोसले यांचा समावेश आहे. खजिनदार म्हणून प्रकाश मरगाळे तर हिशोब तपासणीसाठी राजू मरवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय सल्लागार मंडळात मालोजीराव अष्टेकर, रमाकांत कोंडुस्कर, विजय पाटील, किरण जाधव आणि रणजीत चव्हाण पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. जनसंपर्क प्रमुख म्हणून विकास कलघटगी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

स्पर्धा विभागासाठी मोठ्या प्रमाणात सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच नियंत्रण मंडळातही अनेक अनुभवी सदस्यांचा समावेश करून मंडळाची रचना अधिक व्यापक करण्यात आली आहे.
या नव्या कार्यकारिणीमुळे यंदाचा शिवजयंती उत्सव अधिक भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*