LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*“उदे ग आई उदे!” जयघोषात यल्लमा देवीची पौर्णिमा यात्रा*

Advertisement
उदे ग आई उदेच्या जयघोषात सौंदत्ती येथील श्री यल्लमा देवीच्या मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त भरलेल्या यात्रेला केवळ कर्नाटकच नव्हे तर महाराष्ट्र गोवा आणि अन्य राज्यातील असंख्य भाविकांनी हजेरी लावली होती. उदे ग आई उदे च्या गजरात आणि भंडाऱ्याच्या उधळणीत भक्तिमय वातावरणात श्री यल्लमा देवींची यात्रा पार पडली.

असंख्य भाविकांच्या उपस्थितीत बुधवारी कंकण मंगळसूत्र विधी पार पडला. गुरुवारी सकाळी महायज्ञ करून धार्मिक विधिना प्रारंभ झाला. वेदशास्त्र संपन्न पुरोहिताना या महायज्ञ साठी निमंत्रित करण्यात आले होते. महायज्ञ झाल्यानंतर देवीला साडी हळद-कुंकू, काकणे भक्तांनी अर्पण केली. देवींची महापूजा झाल्या नंतर आरती करून महानैवेद्य दाखवण्यात आला. यल्लमा डोंगरापासून तीन किलोमीटर अंतरावर पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती.

देवीच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.जोगुळभावी येथील कुंडात भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली होती. दोन दिवसात पाच लाखाहून अधिक भक्तांनी देवीचे दर्शन घेतले.सायंकाळ झाली तरी भंडाऱ्याची उधळण करत आणि उदे ग आई उदेचा जयघोष करत भक्त डोंगरावर येतच होते.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*