राहुल जारकीहोळींचे सहकार क्षेत्रात दमदार आगमन विरोधकांना दिला राजकीय झटका!
बेळगाव : सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी आता सहकार क्षेत्रात पाऊल ठेवत नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. त्यांच्या या पदार्पणामुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात नव्या ऊर्जा आणि उमेदेचे वातावरण निर्माण झाले आहे.
राहुल जारकीहोळी यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ठोस पावले उचलण्याची भूमिका मांडली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी वर्गाला नवीन दिशा आणि बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या नव्या प्रवासात त्यांना बेळगाव जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांचे दृढ मार्गदर्शन लाभणार असून, त्यांच्या अनुभवाचा फायदा सहकार क्षेत्राला मिळणार आहे. विशेष म्हणजे जारकीहोळी कुटुंबाने यावेळी एकत्र येत राजकीय विरोधकांना चिमटा काढला आहे.
https://youtube.com/shorts/SK8zQC4wuco?si=5xUffV-nMuuyCXgY
सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आणि संचालकांनी नव्या पिढीवरील विश्वास व्यक्त करत राहुल जारकीहोळी यांचे स्वागत केले आहे. यामुळे जिल्ह्यातील सहकार चळवळीला नवा जोश आणि दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

