बेळगाव : राष्ट्रनिष्ठ नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त तसेच भाजप बेळगाव महानगरचे उपाध्यक्ष महांतेश वक्कुंद यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा सरकारी रुग्णालयात विशेष सेवा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत महांतेश वक्कुंद अभिमानी मंडळाच्या वतीने रुग्णालयातील बाळंतिणी व इतर रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. समाजासाठी सेवा करण्याचा संकल्प या उपक्रमातून अधोरेखित झाला असून रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
https://youtube.com/shorts/D0qt9T1jebA?si=y7-F_DQEPy5uqWkI

