Press ID & Credential Portal
Apply / Verify  ➔
LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Local News

*गोकाकमध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांची सभा; हक्कांसाठी एकत्र येण्याचे आवाहन*

गोकाक (दि. 13 एप्रिल 2026):
कर्नाटक राज्य सरकार निवृत्त कर्मचारी संघाच्या वतीने गोकाक येथील सामुदायिक भवनात आयोजित सभेत निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन युवा काँग्रेसचे प्रधान कार्यदर्शी राहुल जारकीहोळी यांनी रोपट्याला पाणी घालून केले.

उद्घाटनपर भाषणात राहुल जारकीहोळी यांनी संघटनेच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत, विशेषतः मोफत आरोग्य तपासणी शिबिरांसारख्या उपक्रमांमुळे समाजाला मोठा आधार मिळत असल्याचे नमूद केले. संघ अधिक बळकट करण्यासाठी सदस्य नोंदणी वाढवून संघटित होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी शिक्षण विभागाचे निवृत्त सहसंचालक गजानन मन्नीकेरी यांनी संघटनेच्या उद्दिष्टे व कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन केले. तसेच ज्येष्ठ कामगार नेते अंबीराव पाटील यांनी 80 वर्षे पूर्ण केलेल्या वरिष्ठ सदस्यांचा शाल देऊन सत्कार करत त्यांचा आशीर्वाद घेतला.

संघाचे जिल्हाध्यक्ष एस. जी. सिद्नाळ यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांसमोरील आर्थिक प्रश्नांवर भाष्य करत, भविष्यात महागाई भत्ता (DA) व वेतन आयोगाच्या शिफारशींचा लाभ नाकारण्याच्या शक्यतेबाबत चिंता व्यक्त केली. या संदर्भात देशभरातून पंतप्रधानांना निवेदने सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सिद्नाळ यांनी न्यायालयीन लढ्यांचा उल्लेख करत, पेन्शन हा दान नसून कर्मचाऱ्यांचा हक्क असल्याचे अधोरेखित केले. 7व्या वेतन आयोगानुसार वयोमानानुसार वाढीव पेन्शन, तसेच कम्युटेशन संदर्भातील प्रलंबित मुद्दे सोडवण्याची मागणीही त्यांनी केली.
तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र निवृत्त कर्मचाऱ्यांनी नोंदणी करून आरोग्य योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. जुलै 2022 ते जुलै 2024 दरम्यान निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात संघ पूर्ण ताकदीने लढा देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सभेचे अध्यक्षस्थान के. डी. वालिकार यांनी भूषवले. कार्यक्रमाचे स्वागत खजिनदार दोडमणी यांनी केले, तर सूत्रसंचालन कडी यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*ज्योती सेंट्रल स्कूलच्या फुटबॉल संघाचा दिमाखदार विजय!**इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेळगावात काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर; १०० हून अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग**गुंतवणूकदारांची २,४५९ कोटींची फसवणूक! शिवम असोसिएट्सची ४२७ कोटींची मालमत्ता ED कडून जप्त**बेळगाव जिल्ह्यातील हिरवी मिरची उत्पादकांसाठी पीक विमा योजना; हेक्टरी ३,५५० रुपये हप्ता!**मराठी विद्यानिकेतनच्या मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स क्लबच्या खो खो खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय पातळीवर निवड**१ नोव्हेंबर काळ्या दिनी शुभम शेळके व मनोहर हुंदरे यांचे हिंडलगा कारागृहात अन्नत्याग सत्याग्रह**चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!**आशियाई पॅरा गेम्समध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वातिक पाटील यांचा बेळगावात भव्य सत्कार!*