धम्मवर्गातर्फे संत गाडगेबाबा महाराज यांना अभिवादन..
कोगनोळी ; प्रतिनिधी..
कोगनोळी ता. निपाणी येथील प्रभाग क्रमांक आठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील सामुदायिक भवन येथे धम्म वर्गातर्फे राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून बुद्ध वंदना व त्रिशरण पंचशील घेण्यात आले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना नरजीत विटे म्हणाले संत गाडगेबाबा महाराज यांचे विचार मानवतेसाठी प्रेरणादायी असुन अज्ञान युगात विज्ञान सांगणारे संत कोण असतील तर त्यांचं नाव गाडगेबाबा महाराज आहे असे आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी अहिल्या जिरगे ,अन्विता कानडे,तन्वी विटे,निधी कानडे,सृष्टी मधाळे ,अनुप्रीता जिरगे,कल्याणी विटे,ऋजुता कांबळे,देवयानी विटे ,सायली कांबळे,प्रगती मधाळे,श्रावणी जिरगे,स्वराज विटे,अदिती घस्ते ,अंजली ढोबळे,अभंग विटे,रुद्र कांबळे,समर्पण मधाळे,विश्वराज विटे,स्वरा कानडे ,विराज विटे,श्रावणी कांबळे,शिवांजली विटे,अमृता मधाळ,वैभवी विटे,राजवर्धन घस्ते,विराज विटे,समरजीत माने आदी विद्यार्थी उपस्थित होते..

