*संत रोहिदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी*
संत रोहिदास महाराज चर्मकार युवक संघ जुना पी बी रोड पाटील गल्ली बेळगांव यांच्या वतीने संत रोहिदास महाराज जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली यावेळी फोटो पूजन सहाय्यक आयुक्त कल्याणी व्यंकटेश कांबळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तसेच पालखी आरती भजन व कीर्तन करत टाळ मृदुंगाच्या गजरात प्रमुख रस्त्यावरून शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रा मध्ये सर्व समाज बांधवानी सहभाग घेतला होता महिलांनी पारंपारिक वेश परिधान करून डोक्यावर तुळस घेऊन सहभाग दर्शविला दुपारी भजन व कीर्तन चा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी वॉर्ड क्रमांक 21च्या नगरसेविका प्रीती कामकर व समाजसेवक विनायक कामकर तसेच समाजातील इतर मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्यात आला या नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी खासबाग व शहरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती हे सर्व कार्यक्रम यशस्वी करणेसाठी युवक मंडळ व महिला मंडळ,संत रोहिदास महाराज चर्मकार युवक संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र कांबळे, सेक्रेटरी शंकर कांबळे, खजिनदार तुकाराम आप्पा शिंदे उपाध्यक्ष राजू कांबळे, शंकर नार्वेकर, शंकर शिंदे, मारुती कांबळे, मनीश्वर जाधव, शिवपुत्र सांगली, सुरेश कांबळे, गजानन नांगरे नंदू शिंगणापूर,
शिवाजी कांबळे यांनी भरपूर परिश्रम घेतले

