स्काय वर्ल्ड एव्हिएशन अकॅडमीतील विद्यार्थ्यांची दिल्ली विमानतळावर निवड; सन्मान सोहळ्यात गौरव
बेळगाव :
गोंधळी गल्ली येथील स्काय वर्ल्ड एव्हिएशन अकॅडमीतर्फे प्रशिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या विद्यार्थ्यांची इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट, नवी दिल्ली येथे नियुक्ती झाल्याने बेळगावात अभिमान व्यक्त केला जात आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आयटीसी सांब्राचे असिस्टंट मॅनेजर प्रशांत गवस, बेळगाव भाजपा सचिव नागराज पाटील, अकॅडमीचे सीईओ विनोद बामणे तसेच सरस्वती इन्फोटेकच्या एमडी ज्योती बामणे उपस्थित होते.
https://youtube.com/shorts/50_dtCy8_og?si=FfuSO8KB9o5As4yD
पाहुण्यांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांनी vernacular medium मधून शिक्षण घेतल्यानंतर एव्हिएशन क्षेत्रात उत्तम प्रशिक्षण घेऊन स्वतःमध्ये उल्लेखनीय बदल घडवून आणल्याचे सीईओ विनोद बामणे यांनी सांगितले.
“प्रारंभी हे विद्यार्थी इंग्रजीत संवाद साधण्यात कमी आत्मविश्वास दाखवत होते, मात्र सातत्यपूर्ण प्रशिक्षणानंतर आज ते आत्मविश्वासाने इंग्रजीत संवाद साधू शकतात,” असे ते म्हणाले.
सन्मानित विद्यार्थ्यांमध्ये स्वरा भोसले, हुरखान हुदली, आनंद राठोड, ज्योतिबा माडीवाल आणि अभिलाष संतोष यांचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

