तन्मयी पावले हिची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
बेळगाव :
मराठी विद्यानिकेतन शाळेची बुद्धिबळपटू तन्मयी संभाजी पावले हिने सौंदत्ती-मुन्नवळी येथे १७ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. हासन येथे होणाऱ्या या राज्यस्तरीय स्पर्धेत तन्मयी बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
तन्मयीच्या या यशामागे शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, शिक्षण समन्वयक सविता पवार, तसेच क्रीडा शिक्षक दत्ता पाटील व महेश हगिदळे, प्रशिक्षक श्रीधर बेन्नाळकर आणि वैभवी दळवी यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले आहे.
शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्गाकडून तन्मयीचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तिच्या या यशामुळे मराठी विद्यानिकेतन शाळेचा गौरव अधिक वृद्धिंगत झाला आहे.

