भोई गल्लीतील गटारी तुंबल्या; दुर्गंधीने नागरिक त्रस्त, पालिकेचे दुर्लक्ष?
बेळगांव | प्रतिनिधी
शहरातील भोई गल्ली परिसरात गटारी तुंबल्याने अस्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. साचलेले सांडपाणी आणि कचऱ्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.
https://youtube.com/shorts/I0vGQGZsPgA?si=FA1580zcIwe-bBVU
नागरिकांनी सांगितले की, महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडे गटार स्वच्छतेची मागणी करण्यात आली होती; मात्र प्रत्यक्ष साफसफाई न झाल्याने संताप वाढला आहे. पावसाळ्यापूर्वीच ही परिस्थिती उद्भवल्याने पुढील काळात समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
परिसरातील काही नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु फोनला प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने त्वरित उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी नमूद केले. अन्यथा संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो, अशीही भीती व्यक्त होत आहे.

