द मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे रविवारी शौर्यवीर रन २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. ७९ व्या इन्फंट्री डे निमित्त शौर्यवीर रनचा प्रारंभ शिवाजी स्टेडियम येथून झाला. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडीयर जॉयदीप मुखर्जी यांनी ध्वज दाखवून रनचा प्रारंभ केला.
तीन विभागात घेतल्या गेलेल्या या स्पर्धेमध्ये बेळगाव आणि बाहेरील राज्यातून आलेल्या शेकडो धावपटुनी सहभाग नोंदवला होता.पाच कि मी., सात किमी. आणि एकवीस किमी. अशा तीन विभागात झालेल्या रन मध्ये विद्यार्थी,तरुण तरुणी, माजी सैनिक सहभागी झाले होते.धावण्याच्या मार्गांवर ठराविक अंतरावर पाणी तसेच वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात आली होती. विजेत्यांना रोख रक्कम, मेडल आणि प्रमाणपत्र शिवाजी स्टेडियम येथे ब्रिगेडीयर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते देण्यात आले. शौर्यवीर रन स्पर्धेला बेळगाव आणि बाहेरील धावपटुनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
https://youtube.com/shorts/9I0JUFbw0Q0?si=umqCqIO3inIWdOOi
देशाचे रक्षण करताना बलिदान दिलेल्या सैनिकांच्या गौरवार्थ दरवर्षी 27 ऑक्टोबर या दिवशी इन्फंट्री डे चे आयोजन केले जाते.सगळ्यांनी दैनंदिन जीवनात तंदुरुस्त राहण्यासाठी धावणे आवश्यक आहे असे असे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी विजेत्या धावपटूंना बक्षीस देताना उद्गार काढले.

