श्री महालक्ष्मी देवस्थान उषा कॉलनीत दसरा महोत्सवाचा शुभारंभ
बेळगाव : उषा कॉलनी, बॉक्साईड रोड येथील श्री महालक्ष्मी देवस्थान अभिवृद्धी समितीच्या वतीने यंदाच्या दसरा महोत्सवाला पारंपरिक विधीपूर्वक सुरुवात झाली. घटस्थापना व नवरात्र महोत्सवाचे पूजन नगरसेवक श्रेयश नाकाडी, समाजसेवक सुजित मुळगुंद व राजू टोपन्नावर यांच्या हस्ते चंडिका होम करून संपन्न झाले.
समितीने दिलेल्या माहितीनुसार गुरुवार, दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी सीमोल्लंघन शमी पूजनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी सर्व श्रद्धाळूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

