आर. बी. लंबे फाउंडेशनतर्फे कुर्ली येथे यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी,घोडागाडी आणि बैलघोडा गाडी शर्यतीत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जोड्या सहभागी झाल्या होत्या. चुरशीच्या बैलगाडी शर्यतीत पाचगाव येथील सुनील यांच्या रॉकेट बैज्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकवला.कवठे पिरान येथील सद्दाम मुजावर आणि शिंदेवाडी येथील बापू शिंदे यांच्या बैलजोडीने अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकवला.घोडागाडी आणि बैल घोडा गाडी शर्यत देखील अत्यंत चुरशीची झाली. शर्यतीच्या वेळी हजारो शौकीनानी उपस्थिती लावली होती. बैलांनी जोरात पळावे म्हणून त्यांना मोटारसायकलवरून तरुण मंडळी हाकारे घालत होती. घोडागाडी शर्यतीने तर उपस्थित शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फेडले.बैलांनी घोडा गाडी देखील लक्षवेधी ठरली. विजेत्यांना रोख रक्कम आणि मानचिन्ह प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.