Press ID & Credential Portal
Apply / Verify  ➔
LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Education News

*मराठा मंडळ पॉलिटेक्निकमध्ये नवमतदार नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद*

बेळगाव, दि. २२ सप्टेंबर २०२६ :
मराठा मंडळ पॉलिटेक्निक, बेळगाव येथे भारत निवडणूक आयोगाच्या मतदार जनजागृती उपक्रमांतर्गत नवमतदार नोंदणी व मतदानाबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

या उपक्रमात महाविद्यालयातील २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने मतदार नोंदणीची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन माध्यमातून आपली मतदार म्हणून नोंदणी केली.

मतदानाचा अधिकार हा लोकशाही व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असून, तरुणांनी आपल्या मतदानाच्या अधिकाराबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला. मजबूत राष्ट्रनिर्मितीसाठी जबाबदार नागरिक म्हणून मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे महत्त्वही विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य आर. एस. सूर्यवंशी तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने मतदानाचा अधिकार बजावणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी NSS समन्वयक जी. के. शिवयोगीमठ तसेच विद्यार्थी सचिवांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या नियोजनातून नवमतदार नोंदणी आणि मतदार जनजागृती कार्यक्रम प्रभावीपणे पार पडला.

Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
test*ज्योती सेंट्रल स्कूलच्या फुटबॉल संघाचा दिमाखदार विजय!**इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेळगावात काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर; १०० हून अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग**गुंतवणूकदारांची २,४५९ कोटींची फसवणूक! शिवम असोसिएट्सची ४२७ कोटींची मालमत्ता ED कडून जप्त**बेळगाव जिल्ह्यातील हिरवी मिरची उत्पादकांसाठी पीक विमा योजना; हेक्टरी ३,५५० रुपये हप्ता!**मराठी विद्यानिकेतनच्या मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स क्लबच्या खो खो खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय पातळीवर निवड**१ नोव्हेंबर काळ्या दिनी शुभम शेळके व मनोहर हुंदरे यांचे हिंडलगा कारागृहात अन्नत्याग सत्याग्रह**चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!*