बेळगाव:
दक्षिणकाशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कपिलेश्वर मंदिरात येत्या १२ नोव्हेंबर रोजी श्री काळभैरवनाथ जयंती महोत्सव भक्तिभावात साजरा होणार आहे. या निमित्ताने मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, परिसर भक्तिमय वातावरणाने नटलेला आहे.
उत्सवाच्या मुख्य दिवशी अभिषेक, श्री काळभैरव जन्मोत्सव, महाआरती, महापूजा आणि प्रसाद वाटप यांसारखे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच सायंकाळी भजन, कीर्तन आणि धार्मिक प्रवचनांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या जयंतीनिमित्त ज्या भाविकांना अभिषेक करायचा आहे त्यांनी मंदिरात संपर्क साधावा, असे आवाहन श्री काळभैरवनाथ मंदिर ट्रस्ट कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
कपिलेश्वर हे बेळगावमधील सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक असून, येथे दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक भक्तिभावाने काळभैरवनाथ जयंती साजरी करतात.

