LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*राष्ट्रीय जूडो स्पर्धांमध्ये बेळगाव क्रीडा वसतिगृहाचा दमदार ठसा*

Advertisement
बेळगाव : राष्ट्रीय स्तरावरील विविध जूडो स्पर्धांमध्ये बेळगाव येथील क्रीडा वसतिगृहातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत राज्याचा झेंडा उंचावला आहे. जानेवारी 2026 महिन्यात देशातील विविध शहरांत झालेल्या स्पर्धांमध्ये येथील खेळाडूंनी पदकांची कमाई करत आपली गुणवत्ता सिद्ध केली.

पंजाबमध्ये कास्यपदकांची कमाई

५ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान पंजाब येथे पार पडलेल्या १४ वर्षांखालील शालेय राष्ट्रीय जूडो स्पर्धेत कावेरी सूर्यवंशी आणि श्लोक कातकर यांनी कास्यपदक पटकावत बेळगावचे नाव उज्ज्वल केले.

कोलकात्यात ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत यश

२३ ते २६ जानेवारी २०२६ दरम्यान कोलकाता येथे झालेल्या ज्युनियर नॅशनल जूडो स्पर्धेत सायिश्वरी कोडचवाडकर हिने कास्यपदक जिंकत उल्लेखनीय कामगिरी बजावली.

मणिपूरमध्ये रौप्यपदक

२२ ते २८ जानेवारी २०२६ या कालावधीत मणिपूर येथे आयोजित १७ वर्षांखालील शालेय राष्ट्रीय जूडो स्पर्धेत अंजली पाटील हिने रौप्यपदक पटकावले.

दिल्लीतील १९ वर्षांखालील स्पर्धेत पदकांची लयलूट

२९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान दिल्ली येथे झालेल्या १९ वर्षांखालील शालेय राष्ट्रीय जूडो स्पर्धेत स्पंदना के. वाय., श्वेता अलकनूर, सोनालिका सी. एस., संगमेश मदली, धनुष एल. आणि आर्यन डोंगले यांनी कास्यपदक मिळवत संघाची ताकद सिद्ध केली.

या सर्व यशस्वी खेळाडूंना युवक सक्षमीकरण व क्रीडा विभागाचे उपसंचालक बी. श्रीनिवास, प्रशिक्षक रोहिणी पाटील व कुतुजा मुल्तानी तसेच विभागातील कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.

बेळगाव क्रीडा वसतिगृहातील खेळाडूंच्या सातत्यपूर्ण यशामुळे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला नवी उभारी मिळत असल्याचे मत क्रीडावर्तुळात व्यक्त होत आहे.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*