ताराराणी हायस्कूलच्या मुलींनी चमक दाखवत जिल्हा स्तरीय हॉकीत उपविजेतेपद मिळवले
बेळगाव :
मराठा मंडळाच्या ताराराणी हायस्कूल च्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरीची नोंद करीत जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. डिपार्टमेंट स्पोर्ट्स, बेळगाव यांच्या वतीने चंदरगी येथे झालेल्या या स्पर्धेत हायस्कूलच्या मुलींनी दमदार खेळ सादर करून उपविजेतेपद मिळवले.
यापैकी सात विद्यार्थिनींची राज्यस्तरीय निवड झाली असून, संपूर्ण खानापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशामध्ये संस्थेच्या अध्यक्षा डॉ. श्रीमती राजश्रीताई नागराजू, संचालक मंडळाचे सदस्य श्री. शिवाजीराव पाटील व श्री. परशुराम अण्णा गुरव, मुख्याध्यापक राहुल एन. जाधव, ताराराणी पीयू कॉलेजचे प्राचार्य ए. एल. पाटील तसेच क्रीडाशिक्षिका सौ. अश्विनी टी. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या कामगिरीबद्दल संपूर्ण खानापूर तालुका तसेच शाळा परिवारात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.

