बेळगांव:संदल मिरवणुकीच्या वेळी खडक गल्ली येथे मिरवणुकीचा मार्ग बदलून तलवार, लाठी घेऊन दगडफेक करून प्रक्षोभक घोषणा देऊन दहशत माजवणाऱ्यावर कठोर कारवाई करावी आणि निष्पापावरील गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी खडक गल्लीतील रहिवाशांनी पोलीस आयुक्ताकडे निवेदनाद्वारे मागणी केली.
खडक गल्ली आणि परिसरातील शेकडो नागरिकांनी पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून पोलीस आयुक्तांच्या समोर आपले म्हणणे मांडून निवेदन दिले. शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी निवेदनाचा स्वीकार केला.
पोलीस खात्याने या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. सोशल मीडियावर अनेक जण व्हिडिओ व्हायरल करत आहे त्यावर जनतेने विश्वास ठेवू नये. पोलीस खात्याकडून प्रसिद्ध होणाऱ्या प्रसिद्धी पत्रकावरच जनतेने विश्वास ठेवावा असे पोलीस आयुक्तानी निवेदन स्वीकारल्यावर नागरिकांशी बोलताना स्पष्ट केले.
https://youtube.com/shorts/qfB1ftod_io?si=kbz47eQV0CxaBxN0

