LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगावची कन्या तृप्ती देसाई आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकली*

Advertisement
बेळगाव जिल्ह्यातील मच्छे परिसरातील एका मराठी माध्यमातील विद्यार्थिनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. हलशीवाडी (ता. खानापूर) येथील कु. तृप्ती मल्लाप्पा देसाई हिने HEST (Higher Education Scholarship Test) या जागतिक पातळीवरील स्पर्धात्मक परीक्षेत दमदार कामगिरी नोंदवली आहे.

या परीक्षेत तिने कर्नाटक राज्यात प्रथम क्रमांक पटकावत देशभरात पाचवे स्थान मिळवले. विशेष म्हणजे, जागतिक क्रमवारीत तिने २१ वा क्रमांक मिळवत आपल्या अभ्यासू वृत्तीची आणि विश्लेषणक्षमतेची ठोस छाप पाडली आहे.

दोन महिन्यांपूर्वी भारतात झालेल्या SET परीक्षेतही तिने देशात पाचवा आणि कर्नाटकात पहिला क्रमांक मिळवला होता. तब्बल ३५ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत मिळवलेले हे यश तिच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे द्योतक आहे. मागील पंधरा वर्षांत कर्नाटकातून या परीक्षेत यश मिळवणारी ती पहिली मुलगी ठरली आहे.

तृप्ती ही मच्छे येथील मराठी केंद्र शाळेची माजी विद्यार्थिनी असून मराठी माध्यमातून शिक्षण घेत जागतिक पातळीवर झेप घेणे ही बाब विशेष अभिमानाची मानली जात आहे. ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थिनीने कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय संधी मिळवणे हे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

HEST ही परीक्षा विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, विश्लेषणशक्ती आणि शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यासाठी घेतली जाते. जगभरातील सुमारे ४० हजार महाविद्यालये आणि विद्यापीठे या परीक्षेतील गुणांचा विचार करून प्रवेश देतात. तृप्तीच्या उल्लेखनीय यशाच्या बळावर तिची कॅनडातील नामांकित University of Toronto येथे उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेले हे विद्यापीठ कॅनडातील अव्वल शिक्षणसंस्था म्हणून ओळखले जाते.

तृप्तीच्या या यशामुळे तिच्या कुटुंबियांसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या पुढील शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*