LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*राष्ट्रीय जूडोमध्ये वैष्णवी भडांगेची चमक; बेंगलोर येथे गौरवपूर्ण सत्कार*

Advertisement
राष्ट्रीय जूडोमध्ये वैष्णवी भडांगेची चमक; बेंगलोर येथे गौरवपूर्ण सत्कार

बेळगाव | क्रीडा प्रतिनिधी

केरळ येथे पार पडलेल्या अस्मिता खेलो इंडिया वुमन्स राष्ट्रीय जूडो स्पर्धेत 52 किलो वजनी गटात ब्रांझ पदक जिंकणाऱ्या बेळगावच्या कुमारी वैष्णवी भडांगे हिचा बेंगलोर येथे क्रीडा संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यासोबतच चेन्नई येथे झालेल्या राज्यस्तरीय जूडो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून तिने आपल्या गुणवत्तेची ठळक छाप उमटवली आहे.

वैष्णवी ही मराठा मंडळ जिजामाता हायस्कूलची विद्यार्थिनी असून, तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बेंगलोर येथे आयोजित कार्यक्रमात तिचा गौरव करण्यात आला. तसेच मराठा मंडळ जिजामाता हायस्कूलमध्येही विशेष सत्कार सोहळा पार पडला.

या कार्यक्रमास बेळगाव जिल्हा शिक्षण अधिकारी श्रीमती लिलावती हिरेमठ, डाएटचे प्राचार्य श्री. सिंदगी, बेळगाव शहर क्षेत्रशिक्षण अधिकारी श्री. रवी बजंत्री यांच्यासह इतर शिक्षण अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सर्व मान्यवरांनी वैष्णवीचे कौतुक करत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विशेष बाब म्हणजे, मणिपूर येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय जूडो स्पर्धेसाठी वैष्णवीची निवड झाली असून, तिच्या क्रीडा कारकिर्दीतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

तिच्या यशामागे मराठा मंडळच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजु हलगेकर, मुख्याध्यापक श्री. एन. डी. पाटील, शारीरिक शिक्षिका अश्विनी पेटकर तसेच इतर शिक्षकांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले. वैष्णवीच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*