सीबीएसई राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत वेदांत मिसाळेची तिहेरी पदक कामगिरी
बेळगाव : रोहतक (हरियाणा) येथे झालेल्या सीबीएसई राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ज्योती सेंट्रल स्कूलचा विद्यार्थी वेदांत मिसाळे याने शानदार कामगिरी साकारत तीन पदकं पटकावली. १६ ते २१ सप्टेंबर २०२५ या कालावधीत पार पडलेल्या या स्पर्धेत त्याने दोन सुवर्णपदकांसह एक रौप्यपदक जिंकत शाळेचे व शहराचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले.
वेदांतने १०० मीटर आणि २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्णपदके मिळवली. तसेच ५० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत रौप्यपदक पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले.
त्याच्या या कामगिरीबद्दल शालेय SMC कमिटीचे चेअरमन आणि ज्योती कॉलेजचे माजी प्राचार्य आर. के. पाटील, व्हाइस चेअरमन प्रा. आर. एस. पाटील, सेक्रेटरी नितीन घोरपडे, ॲडव्हायझरी डायरेक्टर सौ. मायादेवी अगसगेकर आणि मुख्याध्यापिका सोनाली कंग्राळकर यांनी अभिमान व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वेदांतच्या यशामुळे शाळा व बेळगावचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला असून त्याच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

