VTU कुलगुरू डॉ. एस. विद्याशंकर यांचा सत्कार
बेळगाव :
विश्वेश्वरैया तांत्रिक विद्यापीठाचे (व्हीटीयू) कुलगुरू म्हणून दुसऱ्यांदा पदभार स्वीकारलेल्या डॉ. एस. विद्याशंकर यांचा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष महांतेश वक्कुंद यांनी बेळगावात सत्कार केला.
या प्रसंगी महांतेश वक्कुंद म्हणाले, “डॉ. विद्याशंकर यांचा पुढील कार्यकाळ विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. तांत्रिक शिक्षण क्षेत्राला राष्ट्रीय स्तरावर नवे परिमाण देण्यात त्यांचे नेतृत्व मार्गदर्शक ठरेल. बेळगावातील विद्यार्थ्यांना नव्या संधी उपलब्ध होतील.”
सत्कार स्विकारताना डॉ. विद्याशंकर यांनी विद्यापीठातील शैक्षणिक दर्जा, संशोधन कार्य आणि विद्यार्थी–केंद्रित उपक्रमांना आणखी बळकटी देण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी अंतरयामी फाउंडेशनचे अध्यक्ष नागराज गस्ती, कार्यवाह गिरीश बडिगेर, अक्षक हिरेमठ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

