समाजसेविका माधुरी जाधव यांच्या हस्ते युवराज कदम यांचा सत्कार
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव ग्रामीण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते युवराज कदम यांची नुकतीच कर्नाटक राज्य जलनियोजन व विकास प्राधिकरण (काडा) अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचा विविध स्तरातून सत्कार होत आहे.
या पार्श्वभूमीवर समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी कदम यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. यावेळी त्यांनी कदम यांच्या कार्यकौशल्याचे कौतुक करत, ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्यांचे नेतृत्व नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
सत्कार प्रसंगी श्वेता खांडेकर, मनोहर बेळगावकर, पद्मराज, संतोष कांबळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

