LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगावत 8 ते 19 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन; उत्तर कर्नाटक प्रश्नावर चर्चेची शक्यता*

Advertisement
बेळगांव:कर्नाटक विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 8 ते 19 डिसेंबर दरम्यान सुवर्ण विधानसौध, बेळगांव येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष यू.टी. खादर यांनी दिली. अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

अध्यक्षांनी सांगितले की, अधिवेशनादरम्यान उत्तर कर्नाटकाला वेगळे राज्य देण्याच्या मागणीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, अशा प्रकारच्या मुद्द्यांची उगीचच उचल करणं “अयोग्य” असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अधिवेशन निर्विघ्न पार पडावे यासाठी विविध विभागीय स्तरावरच्या बैठका घेण्यात आल्या असून, सरकारी यंत्रणांना विशिष्ट जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

सुवर्ण विधानसौधात अधिवेशन पाहण्यासाठी रोज फक्त 500 विद्यार्थ्यांनाच प्रवेश असेल आणि त्यासाठी संबंधित डी.डी.पी.आय.कडून पूर्वपरवानगी अनिवार्य असेल.

तसेच, 30 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना संपूर्ण अधिवेशनाचा अभ्यास, प्रेरणादायी सत्रे आणि विभागनिहाय माहिती देणारा विशेष शैक्षणिक कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.

अधिवेशनाच्या पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी उत्तर कर्नाटकातील प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार आहे. संबंधित भागातील आमदारांनी प्रश्न उपस्थित केल्यास सरकारला उत्तर द्यावेच लागेल, असे अध्यक्षांनी नमूद केले.

या वेळी विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरट्टी आणि उपसभापती रुद्रप्पा लामाणी उपस्थित होते.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*