बेळगाव : बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशन (BDSKA) तर्फे आयोजित करण्यात आलेली पहिली अधिकृत रेफरी आणि जज सेमिनार तसेच परीक्षा 15 नोव्हेंबर 2025 रोजी गणेशपूर येथील लोकमान्य भवनमध्ये यशस्वीपणे पार पडली. जिल्ह्यातील कराटे क्रीडा क्षेत्रातील ही महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक घडामोड मानली जात आहे.
एकूण 50 विद्यार्थ्यांनी जज परीक्षा, तर 5 स्पर्धकांनी रेफरी परीक्षेत सहभाग नोंदवला. रेफरी परीक्षेसाठी सहभागी झालेले प्रशिक्षार्थी पुढीलप्रमाणे—
अक्षय परमोजी, चंदन जोशी, अमित वेसाणे, साहिर शेख आणि सचिन भर्मय्यनावर.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक राज्य कराटे असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी भार्गव रेड्डी, तसेच WKF रेफरी शिवदास उपस्थित होते. जिल्हा सचिव जितेंद्र काकतीकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन व संचालन केले.
https://youtu.be/ZzVAialChL0
या उपक्रमाला कराटे संघटनांचे वरिष्ठ मार्गदर्शक आणि राष्ट्रीय पातळीवरील दिग्गजांची थेट साथ मिळाली.
हांशि भारत शर्मा – अध्यक्ष, KIO
शिहान अरुण मच्छैय्या – अध्यक्ष, AKSKA
यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रशिक्षण, सेमिनार आणि परीक्षा प्रक्रियेची आखणी करण्यात आली.
कराटे खेळाडूंना अधिकृत न्यायालयीन ज्ञान, स्पर्धा नियम आणि आंतरराष्ट्रीय मानकांची माहिती मिळण्यासाठी हा उपक्रम मोठा टप्पा मानला जात आहे. सेमिनारला उपस्थित प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांनी BDSKA चे सचिव जितेंद्र बी. काकतीकर यांचे विशेष आभार मानले.

