बेळगाव :
बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी गावचे रहिवासी आणि भारतीय सेनेत कार्यरत असलेले जवान मयूर लक्ष्मण धूपे यांचे कॉम्बॅट ट्रेनिंगदरम्यान झालेल्या अपघातात दुःखद निधन झाले. देशसेवेच्या कर्तव्यावर असताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे आंबेवाडी गावासह संपूर्ण बेळगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
कर्तव्य बजावताना वीरमरण प्राप्त झालेल्या जवान मयूर धूपे यांच्या जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, ग्रामस्थ, माजी सैनिक संघटना व नागरिकांकडून तीव्र शोकभावना व्यक्त केली जात आहे.
शहीद जवान मयूर लक्ष्मण धूपे यांचे पार्थिव उद्या सकाळी बेळगाव येथे आणण्यात येणार असून, मिलिटरी हॉस्पिटल, बेळगाव येथून आंबेवाडी येथील त्यांच्या मूळ गावी अंतिम दर्शनासाठी नेण्यात येईल.
आंबेवाडी येथे सर्व शासकीय सन्मानांसह, एक्स-सर्व्हिसमेन ऑर्गनायझेशन तसेच विविध संबंधित संघटनांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सदर माहिती श्री. शिवबसप्पा कडन्नावर,
जनरल सेक्रेटरी, बेळगाव जिल्हा महाकठ एक्स-सर्व्हिसमेन ऑर्गनायझेशन, बेळगाव यांनी दिली आहे.
देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या जवान मयूर धूपे यांना संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

