LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगावात ‘घरोघरी संविधान’ मोहिम; घरोघरी आंबेडकर संदेश*

Advertisement
बेळगावात ‘घरोघरी संविधान’ मोहिम; घरोघरी आंबेडकर संदेश

बेळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त 2026 सालासाठी भव्य उत्सव साजरा करण्याचा निर्धार बेळगावात करण्यात आला आहे. यासाठी आयोजित बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
शहरातील आंबेडकर उद्यान येथे विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, जयंती उत्सव समिती सदस्य आणि दलित समाजातील नेते यांच्या उपस्थितीत ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी 2026 हे वर्ष सामाजिक चळवळीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

या वर्षात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे 200 वर्ष, संत गाडगे महाराज यांची 150वी जयंती, महाड चवदार तळे सत्याग्रहाचे 100 वर्ष, तसेच समता सैनिक दलाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत असल्याने विविध उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले.

समाजप्रबोधनासाठी वर्षभर गावोगावी ‘घरोघरी संविधान’ आणि ‘घरोघरी आंबेडकर’ या संकल्पनांवर आधारित चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत. यासोबतच युवक, महिला आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि मार्गदर्शनपर कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.
बेरोजगार युवकांना रोजगार मार्गदर्शन, यशस्वी उद्योजकांचा सन्मान, तसेच शासकीय योजनांची माहिती देणे, महिलांना उद्योग क्षेत्रात प्रोत्साहन देणे अशा अनेक उपक्रमांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. याशिवाय अनुभवी नेत्यांचे मार्गदर्शन नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यावरही भर देण्यात येणार आहे.

तसेच 2027 राष्ट्रीय एकता परिषद, साहित्य संमेलन, सांस्कृतिक उत्सव, क्रीडा महोत्सव तसेच संपूर्ण जिल्ह्यावर भीमरथ संविधान शुभयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे.

बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. मल्लेश चौगुले यांची अध्यक्षपदी, तर राजू कल्लेकण्णावर, संतोष कांबळे आणि मनोज हितलमणी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. आकाश हलगेकर यांची जनरल सेक्रेटरी, तर आनंद कोलकार यांची सेक्रेटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

तसेच भीम ज्योत समिती (समता सैनिक दल)
यल्लाप्पा गाडीनायक ,दीपक मैत्री, यशवंत कांबळे.

कार्यक्रम आयोजन समिती
सुधीर चौगुले ,जीवन कुरणे, सुनील बस्तवाडकर, विनोद सोलापूरे, महेश कुलकार, दयानंद बस्तवाडकर, प्रकाश चंपण्णवर , सिद्राय चौगुले, राजशेखर हिंडलगी , प्रमोद बुक्क्याळकर, रघु चलवादी मिलिंद सोळगेकर महादेव तळवार, सुब्रमण्यम (सुबू) कांबळे, संदीप कोळकर

जय संविधान व जय भीम रॅली समिती मध्ये
श्रीनिवास तळवार बसवराज आवरोळी, मोहन कांबळे सुरेश रजकण्णवर, गजानन सोळगेकर सुनील पिरगाने, संतोष हलगेकर, महेश शिगिहळी, युवराज तळवार प्रशांत पुजारी आकाश बेविनकट्टी, संतोष होंगल, दयानंद बस्तवाडकर मिलिंद ऐवळे, रवी बस्तवाडकर, गुंडू तळवार, एडवोकेट राहुल लक्कोली, एडवोकेट विशाल चौगुले, कल्लाप्पा रामचण्णवर, यादव कांबळे, कस्तुरी कोळकर, लक्ष्मण कोलकार, संतोष कांबळे, सागर कोळकर, निंगाप्पा कांबळे, अशोक कांबळे, दीपक दाभाडे.

सलाह समिती मध्ये
कलाप्पा कांबळे, सिद्धप्पा कांबळे, मल्लेश कुरंगी,रामा चव्हाण, गिर्याप्पा कोळकर, बसवराज रायवगोळ, मनोहर मुचंडी महादेव मॅगीनमनी, सिद्राई मैत्री लक्ष्मण छत्रण्णवर, यल्लाप्पा कोलकार, सुरेश गवण्णवर, भावकांण्ण भंग्याबोळ, राजशेखर तळवार, दीपक वाघेला, विजय निरगट्टी, रवी मैत्री , यल्लाप्पा तळवार, मोहन कांबळे आंबी, संदीप खनगावकर, मल्लाप्पा तळवार, परशुराम वंटमूरी, विनोद मॅगीनमनी , भैरू कांबळे, परशुराम कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच विविध समित्यांमध्ये अनेक कार्यकर्त्यांची निवड करून उत्सव यशस्वी करण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*