LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*डीएमएस कॉलेजमध्ये सायबर जनजागृती उपक्रम*

Advertisement
बेळगाव :
सायबर गुन्ह्यांविषयी सजगता निर्माण करण्यासाठी डीएमएस कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स तर्फे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम क्विक हील फाऊंडेशनच्या “सायबर शिक्ष फॉर सायबर सुरक्षा” या राष्ट्रीय उपक्रमाचा भाग म्हणून राबविण्यात आला.

या प्रसंगी सहाय्यक उपनिरीक्षक अप्पासाहेब (ट्रॅफिक दक्षिण पोलिस ठाणे) व पोलीस कॉन्स्टेबल दुंडप्पा गुरुपाद हडपड (कॅम्प पोलिस ठाणे, बेळगाव) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमात प्राचार्य आनंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सायबर सुरक्षेचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी डिजिटल युगात सुरक्षित व जबाबदार नागरिक होण्याची गरज प्रतिपादन केली.

विशेष आकर्षण ठरली ती सायबर वॉरियर्स विद्यार्थ्यांची नाटिका, ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शातून सायबर गुन्ह्यांविरुद्ध लढण्याचा संदेश देण्यात आला.

https://youtube.com/shorts/do6eBgz0Fn4?si=k9sHLvBx80NZCxE-

उपक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी सायबर वॉरियर्सचे अध्यक्ष संजना कदम, सचिव साक्षी कडोलकर, उपक्रम संचालक वैष्णवी तेलसंग व प्रसारमाध्यम प्रमुख अंकिता देशपांडे यांनी यशस्वीपणे केले. शिक्षक समन्वयक प्रा. वर्षा उचगावकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सायबर सुरक्षेबाबत समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*