सांबरा येथील एअर मन ट्रेनिंग स्कुलमध्ये प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या १२६४ अग्निवीर वायूंचा शानदार दीक्षांत समारंभ पार पडला.एअर व्हाईस मार्शल वेंकट मारे यांची दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
बावीस आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या १२६४ महिला, पुरुष अग्निवीर वायुना एअर व्हाईस मार्शल वेंकट मारे यांनी देशसेवेची शपथ दिली. यावेळी अग्निवीर वायुनी शानदार संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. प्रशिक्षण कालावधीत उत्कृष्ट कामागिरी बजावलेल्या प्रशिक्षणार्थिना एअर व्हाईस मार्शल वेंकट मारे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.अग्निवीर वायुनी दीक्षांत समारंभात विविध प्रात्यक्षिके सादर केली. दीक्षांत समारंभाला हवाई दलाचे अधिकारी,अग्निवीर वायुचे कुटुंबीय उपस्थित होते.

