मराठी विद्यानिकेतनमध्ये राजा शिवछत्रपती जयंती साजरी
मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये 19फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्या शाळेतील शिक्षिका कमल हलगेकर उपस्थित होत्या. यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी इयत्ता चौथी'ब'चे वर्गशिक्षक प्रसाद सावंत यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सादर केला. अनन्या सूर्यवंशी व समर्थ पाटील यांनी शिवाजी महाराजांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. शक्ती सिद्राय टुमरी व भक्ती सिद्राय टुमरी या दोघींनी शिवगर्जना सादर केली. संकल्प हळदणकर याने पोवाडा तर संगीत विभागातर्फे 'एकच राजा इथे जन्मला' हे शिवाजी महाराजांचे गाणे सादर करण्यात आले. यासाठी संगीत शिक्षक सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांनी साथ दिली.
जाणता राजा, रयतेचा राजा,स्रियांप्रती आदर , त्यांच्या गडकिल्ल्यांचे प्रदर्शन एकूणच शिवाजी महाराजांच्या जीवनप्रसंगांची मांडणी चौथीच्या विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रके व प्रतिकृतीमधून केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील , शिक्षक समन्वयक सविता पवार व सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार चौथीची विद्यार्थिनी आरोही पाटील हिने केले.

