Press ID & Credential Portal
Apply / Verify  ➔
LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Politics News

*बेळगावच्या व्यापाऱ्यांच्या समस्यांवर लवकरच बैठक; BCCI कडून तोडगा काढण्याचे आश्वासन*

 

बेळगाव : शहरातील मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या पार्किंग, मालवाहतूक, पोलिसांकडून वाहन तपासणी, मेघा गॅस सेवा आणि सणासुदीच्या काळातील जीएसटी तपासणीसारख्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (BCCI) पुढाकार घेणार आहे. संबंधित लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, पोलिस विभाग आणि व्यापाऱ्यांची लवकरच संयुक्त बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन BCCI पदाधिकाऱ्यांनी दिले.

रविवारी पेठेतील बसवेश्वर बँकेच्या सभागृहात गुरुवारी आयोजित BCCI च्या ट्रेडिंग कमिटीच्या बैठकीत व्यापाऱ्यांनी आपल्या अडचणी मांडल्या. बाजारपेठेतील दैनंदिन व्यापारावर परिणाम करणाऱ्या विविध प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

पार्किंगसाठी बहुमजली इमारतीची मागणी

बेळगावच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे व्यापाऱ्यांनी बैठकीत सांगितले. वाहनतळासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे ग्राहकांना वाहने उभी करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी, काही ग्राहक बाजारपेठेत येण्यासही टाळाटाळ करत असल्याची बाब व्यापाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली.

या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून शहरात बहुमजली पार्किंग इमारत उभारण्याची मागणी करण्यात आली. नरगुंदकर बावडी चौकाजवळ उपलब्ध असलेल्या जागेचा या प्रकल्पासाठी विचार केल्यास बाजारपेठेतील वाहनांची गर्दी आणि पार्किंगची समस्या कमी होण्यास मदत होईल, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.

गोदामांपर्यंत माल पोहोचवताना अडचणी

व्यापाऱ्यांनी मालवाहतुकीचा प्रश्नही बैठकीत उपस्थित केला. दुकानांसाठी आवश्यक असलेला माल गोदामांपर्यंत पोहोचवणे आणि वाहनांमधून माल उतरवणे कठीण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

वाहने थांबवण्यासाठी योग्य जागा उपलब्ध नसल्याने माल उतरवताना व्यापारी आणि वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी बाजारपेठेत मालवाहतुकीसाठी योग्य व्यवस्था आणि निश्चित जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

वाहन तपासणीमुळे ग्राहकांना त्रास होत असल्याची तक्रार

बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या प्रमुख ठिकाणी पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात असल्यामुळे ग्राहकांच्या येण्या-जाण्यावर परिणाम होत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली.

वाहनांची कागदपत्रे, हेल्मेट आणि वाहन चालविण्याचा परवाना यांची तपासणी तसेच दंडात्मक कारवाईमुळे ग्राहकांना अडचणी येत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. दंडासाठी खर्च होणाऱ्या पैशांचा बाजारातील खरेदीवरही अप्रत्यक्ष परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांनी नमूद केले.

पोलिसांच्या नियमित कामात अडथळा न आणता बाजारपेठेतील वाहतूक आणि ग्राहकांची वर्दळ सुरळीत राहील, अशी व्यवस्था करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करावी, अशी मागणी BCCI कडे करण्यात आली.

मेघा गॅसच्या सेवांबाबत नाराजी

बाजारपेठेतील गॅस पुरवठा आणि संबंधित सेवांबाबत मेघा गॅस कंपनीविरुद्धही व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. समस्या उद्भवल्यानंतर कंपनीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार बैठकीत करण्यात आली.

या प्रश्नावर संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा करून व्यापाऱ्यांच्या तक्रारींना वेळेत प्रतिसाद मिळावा, यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली.

सणासुदीतील जीएसटी तपासणीबाबत व्यापाऱ्यांची भूमिका

सणासुदीच्या काळात व्यापार वाढत असताना जीएसटी विभागासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून मालसाठ्याच्या तपासणीसाठी दुकानांना भेटी दिल्या जात असल्याने व्यापारात व्यत्यय येत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला.

कायदेशीर तपासणीला विरोध नसल्याचे स्पष्ट करत, मात्र सणांच्या काळात वारंवार होणाऱ्या तपासण्यांमुळे नियमित व्यापार विस्कळीत होणार नाही, याची काळजी संबंधित विभागांनी घ्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.

आमदार, जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार

व्यापाऱ्यांनी मांडलेल्या सर्व समस्यांची दखल घेत BCCI पदाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांशी समन्वय साधण्याचे आश्वासन दिले. आमदार, जिल्हाधिकारी, महानगरपालिका अधिकारी, पोलिस विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांच्या सहभागातून लवकरच बैठक आयोजित करून व्यापाऱ्यांचे प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणले जातील, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

पार्किंग, मालवाहतूक, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी संबंधित प्रश्नांवर संबंधित विभागांशी सातत्याने चर्चा करून शक्य तितका तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही BCCI कडून स्पष्ट करण्यात आले.

बैठकीला मान्यवरांची उपस्थिती

या बैठकीला बसवेश्वर बँकेच्या अध्यक्षा सरला हेरेकर, FKCCI चे संचालक संजीव कत्तिशेट्टी, BCCI चे वरिष्ठ उपाध्यक्ष उदय जोशी, द्वितीय उपाध्यक्ष राजेंद्र मुतगेकर, सचिव मनोजकुमार मत्तिकोप्प, ट्रेडिंग कमिटीचे अध्यक्ष सुधीर चौगुले आणि खजिनदार रमेश लद्दड यांच्यासह BCCI पदाधिकारी आणि व्यापारी उपस्थित होते.

बैठकीनंतर बसवेश्वर बँकेच्या अध्यक्षा सरला हेरेकर यांनी BCCI पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. व्यापाऱ्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी बँकेच्या सभागृहात बैठक आयोजित केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. तसेच व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी BCCI ने पुढाकार घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

 

Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
test*ज्योती सेंट्रल स्कूलच्या फुटबॉल संघाचा दिमाखदार विजय!**इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेळगावात काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर; १०० हून अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग**गुंतवणूकदारांची २,४५९ कोटींची फसवणूक! शिवम असोसिएट्सची ४२७ कोटींची मालमत्ता ED कडून जप्त**बेळगाव जिल्ह्यातील हिरवी मिरची उत्पादकांसाठी पीक विमा योजना; हेक्टरी ३,५५० रुपये हप्ता!**मराठी विद्यानिकेतनच्या मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स क्लबच्या खो खो खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय पातळीवर निवड**१ नोव्हेंबर काळ्या दिनी शुभम शेळके व मनोहर हुंदरे यांचे हिंडलगा कारागृहात अन्नत्याग सत्याग्रह**चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!*