बेळगाव शहर पोलीस आणि जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर मॅरेथॉनचा शुभारंभ आयर्न मॅन संगमेश अनि यांनी ध्वज दाखवून केला.
यावेळी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे आणि जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन उपस्थित होते. मॅरेथॉन मध्ये बेळगाव पोलीस, जिल्हा पोलीस, राज्य राखीव पोलीस,पोलीस प्रशिक्षण केंद्रातील कर्मचारी,यांच्यासह नागरिक आणि क्रीडाप्रेमी सहभागी झाले होते. हेल्थ फॉर ऑल, ड्रग फ्री कर्नाटक आणि अवर पोलीस अवर प्राईड हे संदेश देण्यासाठी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.बेळगाव पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे आणि जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन देखील मॅरेथॉन मध्ये सहभागी झाले होते.

