बेळगाव (प्रतिनिधी):
वरंरकर नाट्य संघ, बेळगाव येथे प्रिती संगम कराओके ग्रुपतर्फे हिंदी प्रणय गीतांचा बहारदार कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हा संगीतमय सोहळा रंगला.
या कार्यक्रमाला मा. जगदीश कुंटे, कार्याध्यक्ष, लोकमान्य ग्रंथालय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री स्वामी समर्थ व शंकर महाराज यांच्या पूजनाने झाली. दीपप्रज्वलनाचे मानकरी मा. कुंटे सर, सुनील धर्माधिकारी, किरण कुलकर्णी, सुहास जोडगुंडे आणि शुभांगी कारेकर होते.
प्रिती संगम ग्रुपचा हा तिसरा सांस्कृतिक उपक्रम असून, या वेळेस ‘प्रणय गीतांचा’ खास थीम ठेवण्यात आला होता.
गायक कलाकारांमध्ये सुनील धर्माधिकारी, किरण कुलकर्णी, सुहास जोडगुंडे, डॉ. राज विवेकी, शुभांगी कारेकर, सायली नाईक, राजेश्वरी हेरेकर आणि वृषाली मराठे यांनी आपल्या सुरेल सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमानंतर ग्रुपचे संघटक सुनील धर्माधिकारी यांनी सांगितले की, “प्रिती संगम ग्रुपतर्फे भक्तीगीते, नाट्यगीते आणि कराओके संगीताचे विविध कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जातात. प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसादच आमच्या कलाप्रवासाला प्रेरणा देतो.”
या कार्यक्रमाने बेळगावातील संगीतप्रेमींना एक आनंददायी संगीतमय संध्याकाळ अनुभवायला मिळाली.

