बेळगाव येथे ‘मेटलर्जी फॉर नॉन-मेटलर्जिस्ट’ कार्यशाळा यशस्वी
बेळगाव : अमेरिकन सोसायटी फॉर मेटलर्जी (ASM) तर्फे मराठा मंडळ पॉलिटेक्निक, बेळगाव येथे तीन दिवसीय ‘Metallurgy for Non-Metallurgist (MNM)’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कर्नाटकात एएसएम चार्टर मिळवणारी ही पहिली संस्था ठरली आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मराठा मंडळ समूहाच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू आणि श्री गोपाळ जीनगौडा यांच्या हस्ते झाले. कार्यशाळेचे मार्गदर्शन पुण्याहून आलेले तज्ज्ञ श्री डी. जी. शिवते आणि श्री राहुल गुप्ता यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मटेरियल सायन्स व मेटलर्जीच्या व्यावहारिक ज्ञानाचे महत्त्व पटवून दिले.
मुख्य अतिथी म्हणून उपस्थित श्री गोपाळ जीनगौडा यांनी विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील स्वतःचे अनुभव सांगत कौशल्यवृद्धी व ज्ञानार्जनासाठी प्रेरित केले. यावेळी प्रमुख संरक्षक म्हणून डॉ. राजश्री नागराजू तर कार्यक्रमाध्यक्ष म्हणून प्राचार्य आर. एस. सूर्यवंशी, उपप्राचार्या सौ. आशा तोरवी आणि एएसएम बेलगाव समन्वयक श्री संजीव इनामदार उपस्थित होते.
कार्यशाळेचे प्रभावी समन्वयन श्री राहुल कडोलकर यांनी केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मेटलर्जी व मटेरियल्स अभियांत्रिकी विषयातील प्रत्यक्ष अनुभव आणि नवीन तांत्रिक दृष्टी मिळाली.

