कपिलेश्वर रोडवरील सिद्धांत पुजारी (२७) या तरुणाने मोबाईलवर डेथ नोट लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या डेथ नोटमध्ये सिद्धांत याने काही जणावर आरोप केला आहे. तीन वर्षांपूर्वी त्याच्यावर दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्याचा देखील त्याने डेथ नोटमध्ये उल्लेख केला आहे.
सिद्धांतने ‘डेथ नोट’मध्ये “मी कोणत्याही मुलीसाठी नव्हे तर आरामदायी आयुष्य जगता येत नसल्यामुळे आत्महत्या करत आहे,” असे त्याने लिहिले आहे.
मी कपिलेश्वर मंदिरात पुजारी म्हणून सेवा बजावत असताना माझ्यावर बलात्काराचा खोटा आरोप करून मला अडकवण्यात आले. नंतर मला मंदिरातून काढण्यात आले. या घटनेमुळे माझे आयुष्य उद्धवस्त झाले असेही डेथ नोटमध्ये लिहिण्यात आले आहे.
सिद्धांतच्या आत्महत्येमुळे परिसरातील नागरिकांत आणि मंदिर परिसरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी सिद्धांतच्या पालकांनी पूर्वी घडलेल्या घटनेमुळे आपल्या मुलाने आत्महत्या केली असून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे. खडेबाजार पोलीसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. सिद्धांत याची डेथ नोट देखील पोलीसांनी ताब्यात घेतली आहे.

