LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*मराठा समाजाने दाखल केली कॅवेट; आरक्षणाविरोधी याचिकांवर एकतर्फी आदेश नको*

Advertisement
मराठा समाजाने दाखल केली कॅवेट; आरक्षणाविरोधी याचिकांवर एकतर्फी आदेश नको – ठाम भूमिका

पुणे :
मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी राज्य शासनाने २ सप्टेंबर २०२५ रोजी हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी केला होता. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता गृहित धरून समाजाकडून खबरदारीचे पाऊल उचलण्यात आले आहे.

मुंबई उच्च न्यायालयात अ‍ॅड. अतुल पाटील यांनी मराठा समाजाच्या वतीने कॅवेट दाखल केली आहे. यामध्ये कोणत्याही याचिकेवर विचार करताना समाजाचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय एकतर्फी आदेश देऊ नयेत, अशी विनंती नोंदविण्यात आली आहे.

ही कॅवेट दाखल करताना मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी वकील गणेश म्हस्के आणि मराठा आरक्षण विषयाचे अभ्यासक प्रशांत भोसले यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

मराठा समाजाच्या सातत्यपूर्ण मागणीच्या अनुषंगाने सरकारने निर्णय घेतला असला, तरी भविष्यात आरक्षणाविरोधी याचिका दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन समाजाने न्यायालयीन लढ्यासाठी तयारी दाखवली आहे.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*