LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*खानापूर-नंदगड मार्गावर दोन ट्रकांची भीषण टक्कर*

Advertisement
खानापूर-नंदगड मार्गावर दोन ट्रकांची भीषण टक्कर; चालक गंभीर जखमी, अपघातामुळे वाहतुकीवर परिणाम

खानापूर : खानापूर-नंदगड मुख्य मार्गावर मंगळवार (7 ऑक्टोबर 2025) रोजी उशिरा रात्री सुमारे 11 वाजताच्या सुमारास नांवगा क्रॉसजवळ दोन ट्रकांमध्ये झालेल्या जोरदार धडकेत एक चालक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

धडकेचा आवाज एवढा प्रचंड होता की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. एका ट्रकचा चालक केबिनमध्ये अडकून पडला होता. घटनास्थळी तत्काळ पोहोचलेल्या नंदगड 108 रुग्णवाहिका पथकाने अथक प्रयत्न करून चालकाला बाहेर काढले आणि प्राथमिक उपचारानंतर खानापूर सरकारी रुग्णालयात दाखल केले. नंतर अधिक उपचारासाठी त्याला बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

https://youtube.com/shorts/tscABFTCbOM?si=CxjxpiOfLJ5rwjGf

दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, प्राथमिक माहितीनुसार एका वाहनाचा ताबा सुटल्यामुळे धडक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. खानापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.

या अपघातामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती, मात्र पोलिसांच्या तातडीच्या हस्तक्षेपाने रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*