तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरिज,वनिता विद्यालय यांना विजेतेपद.
बेळगाव तारीख 26. मराठी विद्यानिकेतन शाळेच्या मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने घेण्यात आलेल्या बेळगाव शहर तालुकास्तरीय माध्यमिक क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरिज वनिता विद्यालय यांनी विजेतेपद पटकाविले .
मुलांच्या अंतिम सामन्यात सेंट मेरीज शाळेने गजाननराव भातकांडे शाळेचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले तर मुलींच्या प्राथमिक व माध्यमिक गटात वनिता विद्यालय शाळेने विजेतेपद पटकाविले ,आता वरील दोन्ही संघ आगामी होणाऱ्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे पाहुण्या बेळगाव शहराच्या पीईओ जहिदा पटेल, के आर शेट्टी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रणय शेट्टी , जिल्हाध्यक्ष आर आर पी वंटगुडी,नागराज भगवंतण्णावर , सचिन कुडची, चंद्रकांत पाटील, प्रकाश बजंत्री, दत्ता पाटील, मारुती मगदूम, देवेंद्र कुडची किरण तरळेकर, संजीव केळगिरी आनंद चव्हाण, सुनील देसाई सचिन पिल्ले, या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

