LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगावच्या स्केटर्सचा राज्यस्तरावर झळकलेला सुवर्णठसा*

Advertisement
बेळगाव :
बेळगावचा क्रीडा विश्व पुन्हा एकदा उजळून निघाले आहे. ४१ वी कर्नाटक राज्य रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप आणि निवड चाचण्या २०२५ मध्ये मिशन स्केटिंग अकॅडमी व बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमीच्या स्केटर्सनी उल्लेखनीय कामगिरी करत ६३ व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप २०२५ साठी आपले स्थान निश्चित केले आहे.

ही राज्यस्तरीय स्पर्धा ८, ११ आणि १२ ऑक्टोबर २०२५ रोजी विविध श्रेणींमध्ये (इनलाइन/रोलर फ्रीस्टाइल, अल्पाइन/डाउनहिल, कलात्मक स्केटिंग, स्केटबोर्डिंग, रोलर स्कूटर) पार पडली.

बेळगावच्या स्केटर्सनी चमकदार कामगिरी करत खालील पदके मिळवली:

Above 18 Boys:
🥇 देवेन् बामणे – स्पीड स्लालॉम (Gold)
🥈 अभिषेक नवळे – स्पीड स्लालॉम (Silver)

15-18 Boys:
🥈 जयध्यान एस. राज – स्पीड स्लालॉम (Silver), क्लासिक स्लालॉम (Silver)

15-18 Girls:
🥈 रश्मिता दिनेश अंबिगा – स्पीड स्लालॉम (Silver), क्लासिक स्लालॉम (Silver)

12-15 Boys:
🥇 अवनीश कोरीशेट्टी – स्पीड स्लालॉम (Gold), क्लासिक स्लालॉम (Silver)

12-15 Girls:
🥇 दृष्टि अंकेले – स्पीड स्लालॉम (Gold), क्लासिक स्लालॉम (Silver)

10-12 Boys:
🥈 हीरेन एस. राज – स्पीड स्लालॉम (Silver), क्लासिक स्लालॉम (Gold)
🥉 अथर्व हादपद – स्पीड स्लालॉम (Bronze)

8-10 Boys:
🥇 मानन अंबिग – स्पीड स्लालॉम (Gold)
🥇 सैराज मेंडके – डाउनहिल (Gold), अल्पाइन (Gold)
🥉 खुशी आगासिमनी – आर्टिस्टिक स्केटिंग (2 Bronze)

https://youtube.com/shorts/ARqn5ZeY6qE?feature=share

या विजेत्या स्केटर्सचा सन्मान समारंभ भरतेश इंग्लिश मीडियम स्कूल, बेळगाव येथे पार पडला. या कार्यक्रमात बीईटीचे व्हाईस चेअरमन श्रीपाल खेमलापरे, सेक्रेटरी विनोद दोड्डन्नावर, जी.सी. चेअरमन बीईएमएस संजीव दोड्डन्नावर, प्राचार्या सारिका नाईक यांच्या हस्ते स्केटर्सना पुष्पगुच्छ व मेडल प्रदान करून गौरव करण्यात आला.

या स्केटर्सना प्रशिक्षक मंजुनाथ मंडोळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या मेहनतीमुळेच ही यशस्वी कामगिरी शक्य झाली आहे.

आता हे सर्व स्केटर्स ६३ व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप २०२५ मध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणार आहेत, ज्यामुळे बेळगावच्या क्रीडाजगतात अभिमानाची भर पडली आहे.

 
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*