LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*सीमाभागाचा खंबीर आधार हरपला…*

Advertisement
सीमाभागाचा खंबीर आधार हरपला…

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष आदरणीय दीपक दळवी साहेब आज आपल्यातून कायमचे निघून गेले, ही बातमी मनाला चिरून जाणारी आहे. प्रामाणिकपणा, निष्कलंक चारित्र्य आणि धडाडीचं नेतृत्व यांचा संगम असलेली ही थोर व्यक्तीमत्त्व आज हरपलं. त्यांच्या जाण्याने सीमाभागातील प्रत्येक मराठी माणूस पोरका झाल्यासारखा वाटतो आहे.

चळवळीत काम करणाऱ्या माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी दळवी साहेब म्हणजे केवळ नेता नव्हते, तर प्रेरणास्थान होते. त्यांच्या एका कौतुकाच्या शब्दाने, पाठीवरच्या एका थापेने आम्हाला नवसंजीवनी मिळायची. संघर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी आम्हाला लढायला शिकवलं, उभं राहायला शिकवलं.

प्रशासनासमोर अभ्यासू, ठाम आणि प्रभावी भूमिका कशी मांडावी, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं. त्यांच्या नेतृत्वाखाली सीमालढ्याला नवी दिशा आणि बळ मिळालं.

साहेब, तुमच्या जाण्याने एक अपूरं न भरून येणारं पोकळी निर्माण झाली आहे. पण तुम्ही दिलेली शिकवण, तुमचा लढाऊ बाणा आणि मराठी अस्मितेसाठीचा जाज्वल्य अभिमान आम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा देत राहील.

तुमच्या या कार्यकर्त्याकडून तुम्हाला अखेरचा मनःपूर्वक जय महाराष्ट्र…
भावपूर्ण श्रद्धांजली 💐

तुमचा विश्वासू कार्यकर्ता
शुभम विक्रांत शेळके
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*