माजी सरपंच पंडलिक यल्लप्पा मोरे यांचे निधन
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तालुक्यातील बसरीकट्टी (शिवाजी गल्ली) येथील ज्येष्ठ नागरिक व माजी सरपंच श्री. पंडलिक यल्लप्पा मोरे (वय 78) यांचे काल निधन झाले. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
स्वर्गीय मोरे यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत गावाच्या विकासात मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ३ वाजता बसरीकट्टी गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, पाच विवाहित मुली, दोन भाऊ तसेच मोठा परिवार आणि नातेवाईकवर्ग असा परिवार आहे.
ते बेळगावचे माजी महापौर विजय मोरे यांचे काका होत.
गावातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण केली आहे.

